1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 18 एप्रिल 2024 (14:51 IST)

प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात

बॉलिवूड अभिनेत्री देशी गर्ल नावाने ओळखली जाणारी प्रियंका चोप्रा हिचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. तिने इंस्टाग्रामवर एक फोटो टाकला असून त्या फोटोमध्ये ती गंभीर जखमी अवस्थेमध्ये दिसली. ज्यामध्ये तिच्या डोक्यावर रक्ताचे डाग दिसत आहेत. तिचा हा फोटो पाहून तिचे चाहते चिंता व्यक्त करतांना दिसलेत. 
 
बॉलिवूड स्टारच्या तब्येतींबद्दल चाहते जाणून घेण्यासाठी आतुरता. तसेच प्रियंकाने हा फोटो शेयर केला असून त्यामध्ये तिच्या डोक्याला झालेली दुखापत दिसत आहे. प्रियांका चोप्रा ही काही स्टंट करतांना दिसली होती. ही एक कॉमेडी फिल्म आहे असून चित्रपटाचे शूटिंग करतांना ती स्टंट करत होती त्या वेळेस तिला ही दुखापत झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रियंकाने सांगितले की सध्या फ्रॉन्समध्ये आमचे शूटिंग सुरु आहे, व चित्रपटाच्या वेळी स्टंट करतांना अपघात झाल्याचे तिने सांगितले, मी माझे स्टंट स्वतः करते असे देखील ती म्हणाली. पण तिचा हा जखमी असलेला फोटो पाहून मात्र प्रियंकाच्या चाहत्यांना तिची चिंता वाटत आहे

Edited By- Dhanashri Naik