मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 14 एप्रिल 2024 (16:17 IST)

कार दरीत कोसळली, अपघातात चार तरुणांचा मृत्यू

Road accident
उत्तराखंडमधील बागेश्वरमध्ये भीषण अपघात झाला. येथील बालीघाट-धरमघर मोटार रस्त्यावर चिरांगजवळ रविवारी पहाटे पाचच्या सुमारास कार दरीत कोसळली. या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन आणि महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये तीन तरुण एकाच गावातील आहेत. गावातील पूजेसाठी हे तरुण सरयू नदीतून पाणी गोळा करण्यासाठी बागेश्वरला येत होते, असे सांगण्यात येत आहे. नवरात्रीनिमित्त गावात पूजेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा तरुण रविवारी पहाटे बागेश्वर येथे पूजेसाठी गंगाजल घेण्यासाठी गेले होते.कार रस्त्याच्या कडेला जाऊन दरीत कोसळून चौघांचा जागीच मृत्यू झाला. कमल प्रसाद (26)नीरज कुमार (25 )दीपक आर्य (22), कैलाश राम (25)अशी मयत तरुणांची नावे आहे.अपघातात मृत्युमुखी पडलेले नीरज आणि दीपक हे सख्खे भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Edited By- Priya Dixit