1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 एप्रिल 2024 (15:21 IST)

बस आणि कारची धडक होऊन अपघातात पाच ठार

accident
तामिळनाडूतील तिरुपूर येथे मंगळवारी सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. काही जण जखमीही झाले आहेत. ज्या कारमधून हे लोक प्रवास करत होते ती बसला धडकली. त्यामुळे हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांना गंभीर अवस्थेत तिरुपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांसह मदत आणि बचावकार्य सुरू केले. मृत व जखमींना कारमधून बाहेर काढण्यासाठी पोलिसांना  क्षतिग्रस्तकार फोडावी लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, तिरपुरचे चंद्रशेखर आणि चित्रा हे दाम्पत्य त्यांचा लग्नाचा 60 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मंगळवारी सकाळी वेल्लकोईल मार्गे तिरपुरला परत येत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्रिचीच्या दिशेने जाणारी तामिळनाडू सरकारी बस आणि त्यांचा कारची धडक झाली. या अपघातात कार मधील चंद्रशेखर,चित्रा, आणि तिघांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कार व बस जप्त करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघाताचा तपास करत आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit