1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Relief to Raj Kundra, Supreme Court grants pre-arrest bail

राज कुंद्राला दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. राज कुंद्रासोबतच, सुप्रीम कोर्टाने शर्लिन चोप्रा, पूनम पांडे आणि उमेश कामत या मॉडेल्सलाही अश्लील साहित्य बनवून OTT प्लॅटफॉर्मवर दाखवल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सर्व आरोपींनी तपासात सहकार्य करावे आणि गरज पडल्यास तपासात सहभागी व्हावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 
 
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. राज कुंद्रा यांनी मुंबईच्या आसपास असलेल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये अश्लील चित्रपटांचे शूटिंग केले आणि नंतर ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. राज कुंद्राने हा सौदा करोडोंमध्ये केला होता. राजने पूनम आणि शर्लिनसोबत हे चित्रपट शूट केल्याचे बोलले जात होते. 
 
राज कुंद्रा यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांच्या वकिलाचे वक्तव्य समोर आले आहे. ही बाब आपल्याला प्रसारमाध्यमांवरूनच कळली असून कायद्यानुसार न्यायालयात हजर झाल्यानंतर आरोपपत्राची प्रत घेणार असल्याचे वकिलाने सांगितले होते. एवढेच नाही तर मीडिया रिपोर्ट्स आणि एफआयआरमध्ये जे आरोप केले जात आहेत, त्याच्याशी त्याच्या अशिलाचा काहीही संबंध नाही, असे वकिलाने सांगितले. राज कुंद्राला गेल्या वर्षी जुलैमध्ये मोबाईल अॅप्लिकेशनवर अश्लील फिल्म बनवून अपलोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर तो तुरुंगात होता आणि सुमारे दोन महिन्यांनी जामीन मिळाला. 
 
Edied By - Priya Dixit  
 
पुढील लेख
Athiya Shetty KL Rahul Wedding : अथिया आणि राहुलच्या लग्नाची तारीख ठरली, या दिवशी वैवाहिक बंधनात अडकणार