मंगळवार, 26 सप्टेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (17:12 IST)

Richa Chadha-Ali Fazal Wedding: लखनौमध्ये प्री-वेडिंग फंक्शन मध्ये दिसली रिचा-अलीची अवधी स्टाईल

रिचा चढ्ढा आणि अली फजल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनचा जोरदार आनंद घेत आहेत आणि भरपूर फोटोशूट करत आहेत. दिल्लीतील प्री-वेडिंग फंक्शन एन्जॉय केल्यानंतर दोन्ही स्टार्स लखनौत पोहोचले.अनेक बातम्यांनुसार त्यांचे लग्न आज म्हणजेच 4 ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे. पण याआधी दिल्ली आणि लखनऊमध्ये दोघांनीही कुटुंबासोबत प्री-वेडिंग फंक्शन्सचा आनंद लुटला आहे, ज्याचे फोटोही समोर आले आहेत.
 
29 आणि 30 सप्टेंबर रोजी दिल्लीत रिचा आणि अलीच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन्स पार पडले. यावेळी त्यांच्या हळदी, मेहंदी आणि संगीताचे विधी पार पडले. या कार्यक्रमानंतर दोघेही लखनौला पोहोचले. त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांसाठी तिथे रिसेप्शन पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान अली गोल्ड-बेज शेरवानीमध्ये आणि रिचा ऑफ व्हाइट आउटफिटमध्ये दिसली. यासोबतच रिचाने हेवी ज्वेलरीही परिधान केली होती. गळ्यात हार, चांदबली, कपाळावर फासे आणि नाकात नथ घालून तिने तिचा लूक पूर्ण केला. अवधीचा ड्रेस दोघांवर छान दिसत होता. दोघांचे ड्रेस डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केले होते.
 
या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स संपले आहेत, आता दोघांची लग्न गाठ बांधणार  आहे. लग्नाच्या ठिकाणापासून ते सजावट आणि लूकपर्यंत चाहते या दोघांची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर 7 ऑक्टोबरला होणाऱ्या रिसेप्शनवरही चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.