गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

जिस देश में सचिन बहता है... बिग बी

मैं उस देश का वासी हूँ, जिस देश में सचिन बहता है. हे कोणत्या हिंदी चित्रपटाचे गाणे नाही तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बद्दलचे हे गौरवोद्वार आहेत आणि हो कुण्या साध्या सुध्या व्यक्तीने हे कौतुक केलेले नाही. तर साक्षात बिग बी, महानायक अमिताभ बच्चन यांनी काढलेले हे गौरवोद्वार आहे. निमित्त होते सचिन: अ बिलियन ड्रिम्स चे.

 
क्रिकेटचा देव असलेल्या सचिनच्या जीवनावर आधारित 'सचिन: अ बिलयन ड्रिम्स' या चित्रपटाच्या खास प्रिमिअर शोचे आयोजन करण्यात आले होते. या प्रिमियर शोला बॉलीवूड लोटले होते. सुपरस्टार शाहरूख खान, आमिर खानसह बिगबी अमिताभ बच्चनही यावेळी उपस्थित होते. यावेळी अभिताभने सचिनबरोबर विविध अँगलने अनेक फोटो काढले. या फोटोंना आकर्षक कॅप्शनही देऊन ते ट्विटरवर शेअरही केले.
 
ट्विटरवर पोस्ट करताना अमिताभ अत्यंत भावुक झाले होते. काल रात्री सचिन: अ बिलियन ड्रिम्स पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर गर्व वाटला आणि भारावून गेलो. मै उस देश का वासी हूँ, जिस देश में सचिन बहता है. असे ट्विट करून अमिताभ यांनी सचिनबद्दलच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.