1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सचिनच्या biopic सिनेमा प्रिमिअरमध्ये टीम इंडिया, बॉलीवूड (पहा फोटो)

Sachin Tendulkar's biographical film premiere photos
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सचिन अ बिलियन ड्रीम्स या सिनेमाच्या प्रिमिअर शो पाहण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी अवघी टीम इंडिया आणि बॉलीवूडचे अनेक सितारे आले होते.
 
सचिनच्या जीवनावर आधारित हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, आर. अश्विन, मोहम्मद शमी यांनी हजेरी लावली असून अनुष्का शर्मादेखील विराटसोबत उपस्थित होती. याव्यतिरिक्त सुपरस्टार शाहरूख खान, आमिर खान आणि बच्चन कुटुंबदेखील यात सामील होते. 
 
यासाठी दोन स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. पहिला शो 4.30 वाजता होता ज्यात क्रिकेट जगातील लोकं तर संध्याकाळी 7.30 आयोजित दुसर्‍या शोमध्ये बॉलीवूड सेलीब्रेटी सामील झाले. बॉलीवूडहून शाहरुख, आमिर, अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या, एआर रेहमान, रणवीर सिंग, ‍अनिल कपूर, कबीर खान, आशुतोष गोवारिकर, आशा भोसले, अरशद वारसी, सोनू निगम, उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानीसह अनेक महान लोकांना हा सिनेमा बघितला.