शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 3 जुलै 2021 (15:35 IST)

जेव्हा आमिरने पहिल्या पत्नीबरोबरच्या घटस्फोटाला सांगितले होते दुखद

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान एकदा करण जोहरच्या लोकप्रिय शो कॉफी विथ करणमध्ये पाहुणे म्हणून दिसला होता. या दरम्यान, आमिर आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलेपणाने बोलले आणि अनेक रहस्ये उघड केली.
 
शोमध्ये आमिर त्यांची पहिली पत्नी रीना दत्ताबद्दल बोलले. रीना आणि किरणच्या बॉन्डिंगचा उल्लेखही केला. आमिरने सांगितले की रीना आणि मी 16 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. जेव्हा दोघे वेगळे झाले, तेव्हा कुटुंब कोसळलं. हे खूप वाईट होतं.
 
असे असूनही आम्ही एकत्रितपणे एका कठीण परिस्थितीतून स्वत: ला बाहेर काढले, असे ते म्हणाले. विभक्त झाल्यानंतरही, मी आणि रीना एकमेकांबद्दल कधीही प्रेम आणि आदराची भावना कमी होऊ दिली नाही. नातं तुटलं असावं, पण रीनाबद्दलचा त्यांचा आदर आणि प्रेम संपलं नाही.
 
किरण आणि रीना यांच्यातील बॉन्डिंगविषयी बोलताना आमिर म्हणाला की दोघेही बर्‍याचपैकी मॅच्युर आहेत. दोघांची मैत्री घडविण्यात माझे थोडेसे योगदान नाही. दोघेही स्वत: चांगले मित्र बनले आहेत. दोघांमधील चांगली बॉन्डिंग त्यांच्यामुळेच आहे.
 
आमिर खानने 1986 साली रीना दत्ताशी पहिले लग्न केले होते. नंतर दोघांचेही घटस्फोट झाले. यानंतर आमिरने किरण रावशी लग्न केले. आता आमिरने किरणशी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.