गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (22:43 IST)

‘सडक २’ ला IMDb वेबसाइटवर सर्वांत कमी रेटिंग

अभिनेत्री आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट्ट यांची मुख्य भूमिका असलेला ‘सडक २’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. परंतु या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांकडून सर्वांत वाईट प्रतिक्रिया मिळत आहेत. इतकंच नव्हे तर IMDb वेबसाइटवर या चित्रपटाला सर्वांत कमी रेटिंग मिळाली आहे. ‘सडक २’च्या ट्रेलरलाही युट्यूबवर लाइक्सपेक्षा डिसलाइक्स फार होते. २०२० या वर्षातला हा अत्यंत वाईट चित्रपट असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक-समीक्षकांकडून येत आहे.
 
महेश भट्ट यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा व त्याचं दिग्दर्शन पूर्णपणे अपयशी ठरल्याचं म्हटलं जात आहे. त्याचप्रमाणे त्यातील भूमिकांना कोणताच अर्थ नसल्याची टिप्पणी समीक्षकांनी दिली आहे.