1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020 (13:53 IST)

रिया चक्रवर्ती-महेश भट्ट यांचे व्हॉट्सऍप चॅट व्हायरल

rhea chakraborty
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. सुशांत आणि त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती ८ जून रोजी त्याचं घर सोडून गेली होती. आतापर्यंत असं समोर येत होतं की सुशांतच्या सांगण्यावरून तिने घर सोडलं होतं. पण आता रिया आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांचे व्हॉट्सऍप चॅट व्हायरल झाले आहे. दोघांमधील हे चॅट ८ जून रोजी  झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. रिया सुशांतसोबत असलेल्या नात्यामुळे आनंदी नसल्याचा अंदाज या  चॅटवरून समोर येत आहे.
 
सुशांतचे घर सोडल्यानंतर तिने तात्काळ महेश भट्ट यांना मेसेज पाठवला होता. 'आयशाने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. तुमच्यासोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाने माझे डोळे उघडले. तुम्ही माझे देवदूत आहात. तुम्ही तेव्हाही होते आणि अजूनही आहात', असं रियाने म्हटलं आहे.
 
यावर महेश भट्टयांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. 'आता मागे वळून पाहू नको. जे संभव आहे ते साध्य करून दाखव. तुझ्या या निर्णयामुळे तुझे वडील खूश होतील.' असं महेश भट्ट म्हणाले आहेत. यावरून अभिनेत्रीचे वडीलही या नात्यावर खूश नव्हते, असं स्पष्ट होत आहे.
 
दरम्यान सुशांतच्या आत्महत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे तरी देखील त्याच्या आत्महत्ये मागचं ठोस कारण समोर आलेलं नाही. मुंबई आणि बिहार पोलिसांनंतर सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपावण्यात आली आहे.