रविवार, 5 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 ऑक्टोबर 2025 (15:35 IST)

'पिंजरा' चित्रपटातील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन

Veteran actress Sandhya Shantaram passes away
Photo X
हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या नृत्य कौशल्यानेअभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.  त्यांच्या निधनाने सिनेइंड्रस्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री संध्या या सुप्रसिद्ध दिगदर्शक व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. 
त्यांच्या निधनाची बातमी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड.आशिष शेलार यांनी ट्विट करून दिली. त्यांनी लिहिले भावपूर्ण श्रद्धांजली! पिंजरा चिरटपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांतारामजी यांचे निधन झाले आहे.
ही बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली.त्यांनी झनक झनक पायल बाजे आणि दो आँखे बराच हाथ आणि पिंजऱ्यातील साकारलेली अजरामर भूमिके प्रेक्षकांच्या मनात कायम राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो!
  
संध्याजींचे खरे नाव विजया देशमुख होते. रंजना देशमुख त्यांच्या मावशी होत्या.  त्या व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. संध्या यांनी अभिनयाचे आणि नृत्याचे धडे मावशी रंजना यांच्याकडून शिकले. संध्या या नृत्यामध्ये पारंगत होत्या. पिंजरा चित्रपटातील साकारलेली त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. 
नवरंग, अमर भूपाळी, दो आँखे बराच हाथ, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, चंदनाची चोळी अंग अंग जाळी, झनक झनक पायल बाजे हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहे. 
त्याच्या मृत्यूच्या बातमीमुळे शोककळा पसरली आहे. 
 
Edited By - Priya Dixit