गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (12:55 IST)

WhatsApp Chatचा रंग आणि डिझाइन आता बदलणार आहे!

व्हॉट्सअ‍ॅप येत्या काही दिवसांत वापरकर्त्यांसाठी नवीन वैशिष्ट्ये घेऊन येतो आणि आता ते एका नव्या फीचरवर काम करत आहे. WABetaInfoने उघड केले आहे की नवीन फीचर चैट डिझाइनशी जोडलेले आहे, जे डार्क मोडसाठी येणार आहे. अहवालात असे म्हटले आहे की व्हॉट्सअ‍ॅप डार्क मोडसाठी नवीन बबल कलर (New bubble Color)ची चाचणी घेत आहे, जो येत्या काळात लॉन्च होईल.
 
WABetaInfoने केलेल्या ट्विटमध्ये असे दिसून आले आहे की नवीन फीचर आयओएस आणि अँड्रॉइड या दोहोंसाठी येईल. असं म्हटलं जात आहे की सध्या त्याची कोणतीही रिलीज तारीख आलेली नाही. हे वैशिष्ट्य सध्या विकास टप्प्यात आहे. हे वैशिष्ट्य खरोखर कसे दिसेल, त्याचा एक स्क्रीनशॉट देखील ब्लॉगमध्ये शेअर केला गेला आहे. असा अहवाल देण्यात आला आहे की स्क्रीनशॉट आयओएस व्हर्जनचा आहे आणि अँड्रॉइडवरही असेच डिझाइन दिसेल.
 
काय आहे फीचर ?
जेव्हा व्हॉट्सअ‍ॅपवर डार्क मोड सक्रिय केला जाईल, तेव्हा आउटगोइंग बबलचा रंग बदलला जाईल.