1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 9 मे 2022 (15:10 IST)

सैफ अली खानचा मुलगा सध्या फिरतोय या मुलीबरोबर

palak ibrahim
बॉलीवूड मधील कलाकारांविषयी सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच उत्सुकता असते. त्यातच या कलाकारांची मुले काय करतात त्याबद्दल देखील नेहमी चर्चा होते.टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. विशेष म्हणजे दोघेही काल रात्री उशिरा मुंबईतील एका प्रसिद्ध फूड जॉइंटबाहेर दिसले. त्यामुळे पुन्हा एकदा दोघांनी नागरिकांना आणखी एकदा चर्चा करण्याची संधी दिली आहे.
 
विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वी पलक तिवारी ही सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमच्या कारमध्ये दिसली होती. दोघेही एका रेस्टॉरंटच्या बाहेर एकत्र दिसले आणि पलक ही मीडियाला पाहताच तिचा चेहरा लपवताना दिसली. त्यानंतर पलक तिवारीही या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना दिसली.पलक तिवारीने सांगितले की, तिने आईला सांगितले नव्हते की, मी मित्रांसोबत आहे आणि त्यामुळेच मीडियाचे कॅमेरे पाहताच तिने चेहरा लपवायला सुरुवात केली. आता पलक-इब्राहिमचा नवीन व्हिडिओ पुन्हा वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. मात्र यावेळी पलक तिवारी मागच्या वेळेच्या तुलनेत पापाराझींसमोर खूप आत्मविश्वासाने दिसली.
 
आपल्या मित्रासोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पलकने मीडिया फोटोग्राफर्सनाही जोरदार पोज दिली आणि आजूबाजूला उभ्या असलेल्या नागरिकांमधून बाहेर पडून हळू हळू तिची गाडी गाठली. यावेळी पलक तिवारी पांढऱ्या क्रॉप टॉप आणि सुंदर हिरव्या स्कर्टमध्ये दिसली. पलकनेही वरून हिरवे जॅकेट घेतले होते. त्याचवेळी इब्राहिम अली खानही कॅज्युअल लूकमध्ये दिसला.पलक आणि इब्राहिमच्या नवीन व्हिडिओवर नागरिक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, किती क्यूट कपल्स दिसते.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘दोघे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यात एक खास बाँडिंग आहे.’ पलक तिवारी अनेकदा ट्रोल्सचे लक्ष्य बनते पण यावेळी ती क्वचितच पाहायला मिळते. पलक तिवारी आणि इब्राहिम अली खानच्या नवीन व्हिडिओला हजारो व्ह्यूज आले आहेत.