मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (16:14 IST)

सुंबूल तौकीरवर चिडला साजिद खान- 18 वर्षांची मुलगी की एडल्ट ?

'बिग बॉस 16' च्या घरात दररोज जबरदस्त ड्रामा पाहायला मिळत आहे. शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये साजिद खान सुंबुल तौकीरशी भिडताना दिसले. साजिदने सुंबुलला म्हटले की मी आजपर्यंत अशी गोंधळलेली मुलगी पाहिली नाही. तिला काय हवे आहे हे तिला स्वतःला माहित नाही.
 
शोमध्ये शालीन आणि गौतममध्ये भांडण झाले होते, त्यादरम्यान सुंबूल त्यांच्यामध्ये येऊन भांडण शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पण दोघेही सुंबूलला बच्ची म्हणून टाळतात. साजिदही हे सर्व पाहत असतो.
 
यानंतर साजिद खान सुंबुलकडे जातो आणि म्हणतो, 'सुंबूल तुला काय पाहिजे? तू रडत असताना शालीन तुझ्यासाठी उभा राहत नाही. तू रडत-रडत त्याला आधार द्यायला सांगत. जेव्हा तो तुझ्यासाठी उभा आहे तर तू त्याला थांबवले. तुला काय हवंय?'
 
यावर सुंबुल म्हणते, 'मी माझी लढाई स्वतः लढू शकते. आणि मी का हस्तक्षेप केला हे तुम्हा सर्वांना समजणार नाही. मला भिती वाटत होती की माझ्या वडिलांना वाटेल की मी स्वतःसाठी लढू शकत नाही.
 
साजिद पुन्हा सुंबुलला म्हणाला, मग शालीन तुला साथ देत नाही तेव्हा तू का रडतेस? तू ठरवं आणि आम्हाला सांग की तुझ्याशी कसे वागायचे. तुला 18 वर्षांचे मूल समजायचे की 18 वर्षांची एडल्ट ? कारण तू तुझे विचार बदलत असते.