शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑगस्ट 2019 (13:58 IST)

“इंशाअल्लाह’चे चित्रीकरण 15 ऑगस्टनंतर

काही महिन्यांपूर्वी संजय लीला भन्साळी यांनी “इंशाअल्लाह’ची घोषणा केली. या चित्रपटात आलिया भट्ट आणि सलमान खान प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला 15 ऑगस्टनंतर सुरूवात होणार आहे, चित्रपटातील काही भाग हा मुंबईत चित्रीत करण्यात येणार आहे. त्यानंतर ऋषीकेश, वाराणसी, हरिद्वार आणि अमेरिकेत याचे चित्रीकरण होणार आहे.

एका वाहिणीच्या वृत्तानुसार चित्रीकरण 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान सुरू होणार आहे. हा चित्रपट 2020 साली ईदला प्रदर्शित होत आहे. सलमान आणि आलियातील वयाचं अंतर पाहता ही जोडी नेमकी पडद्यावर कशी दिसेन याचे कुतूहल तमाम चाहत्यांना आहेच. या चित्रपटात सलमानची भूमिका नेमकी काय असणार हे गेल्याच महिन्यात उघड झाले होते.

सलमान या चित्रपटात फ्लोरिडास्थित एका व्यावसायिकाची भूमिका साकारत आहे. सलमान “इंशाअल्लाह’मध्ये 40 वर्षांच्या व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसेन अशी माहिती मिळाली आहे. तर आलिया ही गंगेच्या काठी राहणाऱ्या एका विशीतल्या तरूणीची भूमिका साकारत आहे. सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार यात आणखी एक अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले आहे. मात्र तिसरी अभिनेत्री कोण आहे हे गुलदस्त्यात आहे.