रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 फेब्रुवारी 2017 (13:17 IST)

सलमानच्या ब्रेसलेटमागचे रहस्य काय?

दबंग अभिनेता सलमान खान याच्या हातात फिरोजी रंगाचे एक ब्रेसलेट हमखास दिसते. हे ब्रेसलेट तो फक्त स्टाइलसाठी नाही तर लकी चार्म म्हणून वापरतो असेही सांगितले जाते. हे ब्रेसलेट त्याचे वडील सलीम यांनी त्याला दिले आहे. काय असावे या ब्रेसलेटमागचे रहस्य ? ज्योतिषशास्त्रानुसार फिसेजी रत्न म्हणजे टरकाईन सर्वांनाच लाभात नाही तर काही खास लोकांना ते लाभते. शुक्र ग्रहाचे हे रत्न आसमानी निळ्या हिरव्या रंगाचे असते व प्रेम सफल होण्यासाठी तसेच मनोरंजन, मीडिया, क्रिएटिव्हीटी,  'जाहिरात अशा प्रसिद्धी क्षेत्रांशी ते जोडले जाते. तसेच दारूडे अथवा ज्यांना जास्त राग येतो त्यांच्यासाठीही ते वापरले जाते.

ज्याला हे रत्न लाभते त्याचे शत्रू क्रोणतेच नुक्सान करू शकत नाहीत तसेच साहस, प्रेम व उमेदीची हे रत्न प्रतीक मानले जाते. ज्यांचे प्रेम असफल होते त्यांना त्याचा फार उपयोग होतो व त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते असेहो सांगितले जाते. ज्यांचे लग्न होण्यात अडथळे येतात ते या रत्नाच्या वापरान दूर होतात. शुक्रवारी सूयोंदयाच्या वेळी हे रत्न धारण केले तर ते जास्त फलदायी ठरते. या रत्नावर आग, अॅसिड याचा परिणाम होत नाही. अरब देशात काळ्या जादूचा प्रभाव सपविण्यासाठी ते वापरले जाते.