शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सोहेलच्या शेरखान मध्ये नसणार सलमान

सोहेल खानच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला चित्रपट शेरखानमध्ये त्याचा भाऊ दबंग स्टार सलमान खान मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. परंतु आता सोहलेने हे वृत्त नाकारत शेरखानमध्ये सलमान खान नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
एका मुलाखतीत बोलताना सोहेल म्हणाला की सध्या मी शेरखानच्या स्क्रीप्टवर काम करत आहे. परंतु याकरिता सलमानभाईला साइन करण्यात आलेले नाही आणि ना तो या चित्रपटामध्ये काम करणार आहे. खणेतर या चित्रपटाच्या कथेनुसार त्यामध्ये एखाद्या तरूण अभिनेता काम करणार आहे आणि त्यासाठी वरूण धवन किंवा टायगर श्रॉफसारख्या अभिनेत्यांच्या नावाचा विचार केला जात आहे. परंतु अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. याशिवाय मी माय पंजाबी निकाह नावाच्या अन्य एका चित्रपटावर काम करत आहे, ज्याचे शूटिंग या वर्षाच्या सुरूवातीला सुरू होऊ शकते.
 
सोहलने सलमानबरोबर काही चित्रपटांमध्ये अभिनयदेखील केलला आहे. आता तब्बल सात वर्षांनंतर तो कबीर खानचा चित्रपट ट्यूबलाइटमध्ये सलमानबरोबर दिसून येणार आहे. चित्रपटातही तो सलमानच्य भावाचीच भूमिका साकारणार आहे.