शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मार्च 2017 (10:41 IST)

अॅडव्हान्स टॅक्स भरण्यात सलमान पहिला

अॅडव्हान्स टॅक्स भरण्यात सलमान खानने अक्षय कुमार आणि हृतिक रोशनला मागे टाकलं आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात सर्वाधिक अॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्यांच्या यादीत सलमान खानचं नाव सर्वात वर आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात सलमान खानने 44.5 कोटी रुपयांचा अॅडव्हान कर भरला आहे, जो मागील वर्षापेक्षा फारच जास्त आहे. 2015-16 मध्ये सलमानने 32.2 कोटी रुपये कर भरला होता. या आकडेवारीनुसार, सलमानच्या वार्षिक उत्पन्नात 39 टक्के वाढ झाली आहे.तर अॅडव्हान्स कर भरण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर  अक्षय कुमार आहे. त्याने 29.5 कोटी रुपयांचा अॅडव्हान्स टॅक्स भरला आहे. या यादीत सलमान आणि अक्षयनंतर हृतिक रोशनचं नाव आहे. त्याने 25.5 कोटी रुपये अॅडव्हान्स टॅक्स म्हणून भरले आहेत.हे आकडे 15 मार्च 2017 पर्यंतचे आहेत. अॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्या टॉप 10 अभिनेत्यांची यादी पाहिली तर सलमान खानने सर्वाधिक कमाई केल्याचं स्पष्ट होतं.