शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2024 (14:19 IST)

सलमान खान चाहत्यावर भडकला

सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये तो चाहत्यांवर भडकताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या मध्ये तुझा फोन बंद कर , मी म्हटलं ना की फोन बंद कर असे ऐकू येत आहे. 

झाले असे की सलमानचा एक त्याच्या नकळत व्हिडीओ एक तरुण घेत होता. जेव्हा सलमानचे लक्ष गेले तेव्हा तो त्याच्यावर भडकला आणि त्याने त्याला फोन बंद करायला सांगितले. सलमान ने त्याला व्हिडीओ डिलीट करायचे म्हटले. हा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर टाकला आहे. 

व्हिडीओ मध्ये दिसत आहे की सलमानच्या पुढे हा तरुण चालत आहे आणि तो सलमानचा व्हिडीओ घेत आहे. त्याला  सलमान ने हे बघितल्यावर तो त्याला बोटाच्या इशाऱ्याने व्हिडीओ बंद करायला म्हणतो तरी ही  तो तरुण ऐकत  नाही तेव्हा सलमान त्याला व्हिडीओ बंद कर आणि डिलीट  कर असं म्हणतो.सलमानच्यासोबत असलेले एअरपोर्टचे कर्मचारी देखील  त्याला व्हिडीओ घेऊ नकोस असे म्हणतात. तेव्हा तो तरुण सॉरी सर असे म्हणतो. तरीही तो तरुण ऐकत  नाही तेव्हा सलमान त्याच्यावर चिडतो. हा व्हिडीओ त्या तरुणाने अपलोड केला आहे. 
 
या वीडियो वर नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. सलमान ने व्हिडीओ दिलीत करायला सांगितल्यावर देखील तू व्हिडीओ का अपलोड केलास असे त्या तरुणाला विचारले आहे. 
 
 Edited by - Priya Dixit