गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (15:16 IST)

सलमान खानचा 'तो' व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

आज अभिषेकच्या वाढदिवशी सलमान, अभिषेक आणि ऐश्वर्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एकेकाळी सलमान आणि ऐश्वर्या यांची जोडी सगळ्यांची आवडीची होती. 

त्यांच्या नात्यात 2000 मध्ये मोठा बदल झाला. आज अभिषेक आणि ऐश्वर्या राय हे प्रसिद्ध कपल आहे. सलमानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे या व्हिडीओ मध्ये 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाचा सीन आहे. या मध्ये सलमान ट्रक चालवत आहे ट्रक चालवताना सलमान गाणं गुणगुणत आहे. त्याच्या बाजूला अभिषेक बसला आहे. सलमान हमसे पूछो तन्हा रहना कैसा लगता है गाणं गुणगुणत आहे. दुसरी कडे अभिषेकला रस्त्यावर ऐश्वर्या असल्याचा भास होतो. तो मागे वळून बघतो. तेव्हा सलमान त्याला विचारतो  काय झालं. स्वप्न बघितलसं मित्रा तुझं ठिकाण आलं. 

या चित्रपटात सलमान खान पाहुणे कलाकार म्हणून होता तर अभिषेक आणि ऐश्वर्या हे मुख्य भूमिकेत होते. 
हा व्हिडीओ फार जुना असून सलमानच्या चाहत्यांनी अनेकदा बघितला आहे. 
 
 Edited by - Priya Dixit