सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (14:56 IST)

सलमान खान या अभिनेत्रीच्या प्रेमात?

salman khan
बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो प्रोफेशनलपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. कधी लव्ह लाइफ तर कधी लग्न या विविध कारणांमुळे चर्चेत असतो. चित्रपट वर्तुळात अशी चर्चा आहे की सलमानला त्याचा नवीन जोडीदार सापडला आहे आणि तो सध्या तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
 
  बहुतेक लोकांना माहित आहे की सलमानचे अभिनेत्रींसोबत अफेअर होते आणि त्यांचे नाते खूपच खराब झाले. पण बातम्यांनुसार, आता सलमान भाई पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. सलमान खान पूजा हेगडेला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. एवढेच नाही तर पूजा सलमानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातही काम करत आहे.
 
उमेर संधूच्या एका ट्विटने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सलमान आणि पूजा रिलेशनशिपमध्ये असल्याचे उमैरचे म्हणणे आहे. उमैरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे – ‘ब्रेकिंग न्यूज… टाउनमध्ये एक नवीन जोडपे समोर आले आहे. मेगा स्टार सलमान खान पूजा हेगडेच्या प्रेमात पडला आहे. सलमानच्या प्रोडक्शन हाऊसनेही पूजाला त्याच्या दोन चित्रपटांसाठी साइन केले आहे. हे दोघे सध्या एकत्र वेळ घालवत असून सलमानच्या जवळच्या मित्रानेही याला दुजोरा दिला आहे.
Edited by : Smita Joshi