मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified बुधवार, 7 डिसेंबर 2022 (17:02 IST)

भावाच्या लग्नात उर्वशी रौतेलाचा कोट्यवधींचा लूक

बॉलीवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या लूक आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्वशी सध्या तिच्या भावाच्या लग्नात व्यस्त आहे. उर्वशीचे लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे चाहत्यांसाठी मेजवानी पेक्षा कमी नाहीत.
 
शहराच्या वर्दळीपासून दूर असलेल्या उत्तराखंडच्या डोंगराळ भागात उर्वशी तिच्या भावाच्या लग्नाचा आनंद घेत आहे. वृत्तानुसार, अभिनेत्री तिच्या भावाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तिच्या गावी गेली होती. एवढेच नाही तर उर्वशी तिचे वडिलोपार्जित घर असलेल्या सकमुंडा गावात जाण्यापूर्वी सिद्धबली मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. उर्वशीने तिच्या आतेभावाच्या लग्नात भरपूर एन्जॉय केलं.