रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 5 डिसेंबर 2022 (15:36 IST)

अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन

pooja benarji
टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन झाले आहे. पूजा बॅनर्जीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
 
पूजा बॅनर्जीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने लिहिले, 'बाबा तुमच्या आत्म्याला शांती लाभो. मला माहित आहे की तू आता चांगल्या ठिकाणी आहेस. ओम शांती ओम. तुमची खूप आठवण येईल.
 
या दु:खाच्या काळात चाहते आणि जवळचे लोक पूजा बॅनर्जीला धीर देत आहेत. सोशल मीडियावर अनेक जण वडिलांना श्रद्धांजली वाहत आहेत.
 
पूजा बॅनर्जी बऱ्याच दिवसांपासून टीव्हीपासून दूर आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात रोडीजमधून केली होती. पूजा बॅनर्जी शेवटची 'कुमकुम भाग्य'मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसली होती.
Edited by : Smita Joshi