गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (12:30 IST)

विक्रम किर्लोस्कर: टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष उद्योगपती विक्रम एस किर्लोस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराच्या झटका आला.
आज (बुधवार) दुपारी 1 वाजता बेंगळुरू येथील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे. कंपनीने जारी केलेल्या अधिकृत माहितीमध्ये असे म्हटले आहे की, उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे अकाली निधन झाले. ही माहिती देताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच सर्वांनी प्रार्थना करावी.
 
Edited By- Priya Dixit