1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 25 जुलै 2025 (14:49 IST)

अभिनेता कमल हासन यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली

कमल हासन यांनी तमिळ भाषेत राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. संसदेतील हे त्यांचे पहिले अधिकृत पद आहे. एमएनएम आणि द्रमुक यांच्या युतीमुळे २०२६ च्या तामिळनाडू निवडणुकीत राजकीय रणनीती मजबूत होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांनी शुक्रवारी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेऊन आपल्या राजकीय प्रवासाची नव्याने सुरुवात केली. कमल हासन यांनी संसद भवनात तमिळ भाषेत शपथ घेतली. तसेच २०१८ मध्ये पक्ष सुरू केल्यानंतर संसदेत ही त्यांची पहिली अधिकृत भूमिका असल्याने त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. राज्यसभेत कमल हासन यांचा प्रवेश हा तामिळनाडूतील राजकीय समीकरणांचा एक भाग मानला जातो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्ष एमएनएमने द्रमुकच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष प्रगतीशील आघाडीला पाठिंबा दिला. या आघाडीने तमिळनाडूतील सर्व ३९ जागा जिंकल्या.  
Edited By- Dhanashri Naik