गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (16:12 IST)

कोईम्बतूरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

arrest
तामिळनाडूच्या कोइम्बत्तूर मध्ये एका महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

कोईम्बत्तूर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्टच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास ती डीन ऑफिसच्या वाहन पार्क करताना तिथे आरोपीने तिचा विनयभंग केला. ती घाबरली आणि आरडाओरड करू लागली. आरोपीने तिथून पळ काढला.पीडित तरुणी आपल्या हॉस्टलच्या खोलीत गेली. 

पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपीला रात्री 1 वाजता अटक करण्यात आली. तो मध्यप्रदेशातील रहिवासी असून तो आरोग्य तपासणी साठी रुग्णालयात आला होता.  
Edited by - Priya Dixit