मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 एप्रिल 2023 (10:40 IST)

सलमानच्या नवीन चित्रपटाचा trailer out

नवी दिल्ली : 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान खान एका अनोख्या लूकमध्ये दिसणार आहे. त्याच्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपट देखील अॅक्शन, रोमान्स आणि भावनांनी परिपूर्ण आहे, त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाची गाणी ऐकण्यासाठी चाहते आधीच रोमांचित झाले आहेत, आता याच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. ट्रेलरमध्ये सलमान खान एका दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे.
  
  सलमान खान लांब केसांमध्ये डॅशिंग दिसत आहे. तो त्याच्या लूक आणि अ‍ॅक्शनने सगळ्यांवर भारी दिसतो. ट्रेलरमध्ये पूजा हेगडेसोबतचे त्याचे संभाषण लोकांना आवडले आहे. त्यांची केमिस्ट्री नेटिझन्सना पसंत पडत आहे. सलमान खानच्या चित्रपटाबाबत ज्या प्रकारची क्रेझ आहे, त्यावरून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड बनवेल असे दिसते. कमाईत 'पठाण'सह इतर मोठ्या चित्रपटांना मागे टाकण्याची शक्यता आहे. या चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर अधिराज्य गाजवले आणि खूप ऐकले जात आहे. या चित्रपटात पाच गाणी आहेत - ‘नाइयो लगदा’, ‘जी रहे थे हम’, ‘Bathukamma’, ‘येंतम्मा’ आणि  ‘बिल्ली बिल्ली.’
 
फरहाद सामजी दिग्दर्शित किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 21 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सलमानने या चित्रपटात केवळ मुख्य भूमिकाच केली नाही, तर तो निर्माताही आहे. चित्रपटात पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, राघव जुयाल, अभिमन्यू सिंग, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल, जस्सी गिल, पलक तिवारी या कलाकारांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत.