रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (10:50 IST)

सना मकबूल 'बिग बॉस OTT 3' ची विजेती ठरली

'बिग बॉस OTT 3' चा विजेता घोषित करण्यात आला असून हे विजेतेपद सना मकबूलला मिळाले आहे. या शोच्या सुरुवातीपासूनच शो जिंकण्याचे आपले ध्येय असल्याचे सांगणाऱ्या सना ने यश मिळवत तिची इच्छा पूर्ण झाली आहे . 
 
तसेच सनाला या शोच्या चमकदार ट्रॉफीसह 25 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. शो दरम्यान, सनाने सांगितले होते की, जर ती शो जिंकली नाही तर तिला निराशेतून सावरण्यासाठी बरेच दिवस लागतील आणि ती डिप्रेशनमध्ये जाईल. तसेच सना म्हणाली की, तिच्या मनातल्या गोष्टी दीर्घकाळ राहतात. मात्र, आता तिची इच्छा पूर्ण झाल्याने तो प्रचंड खूश आहे. सनाच्या विजयाची सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे. 
 
सना मकबूलने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली आणि त्यानंतर तिने अभिनयात प्रवेश केला. 'कितनी मोहब्बत है', 'इस प्यार को क्या नाम दूं' आणि 'विश' सारख्या टीव्ही सीरियलमध्ये ती दिसली होती. तसेच सनाने 'अर्जुन' या मालिकेतही काम केले आहे. तसेच सनाने फेमिना मिस इंडियामध्येही नशीब आजमावले होते.