गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जानेवारी 2023 (08:25 IST)

सप्तमी गौडा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई :कांतारा हा चित्रपट मागील वर्षातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 400 कोटी रुपयांपासून अधिक गल्ला जमविला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री सप्तमी गौडा देखील प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. तिने या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारली होती. सप्तमी आता विवेक अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱया ‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
 
या चित्रपटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने विवेक अग्निहोत्री यांनी सप्तमीचे आभार मानले आहेत. सप्तमीने ट्विट करत ‘या चित्रपटाचा हिस्सा झाल्याने अत्यंत उत्साही आणि आनंदी आहे’ असे नमूद पेल आहे. तिच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत अग्निहोत्री यांनी ‘सप्तमी तुझे स्वागत, द वॅक्सीन वॉरमध्ये तुझी भूमिका अत्यंत सुंदर आहे’ असे नमूद पेल आहे.
 
विवेक अग्निहोत्री यांनी यापूर्वी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच या चित्रपटाने सोशल मीडियावर मोठी प्रसिद्धी मिळविली होती. अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शनात तयार होणारा ‘द वॅक्सीन वॉर’ हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे.  हा चित्रपट 11 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. याचबरोबर याची कहाणी अग्निहोत्री यांनीच लिहिली आहे. हा चित्रपट कोरोना महामारीच्या काळात लसीवरून झालेल्या राजकारणाची कहाणी मांडणार आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor