शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (09:26 IST)

सरोज खान यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांना श्वासोच्छवासाच्या अडचणीमुळे मुंबईच्या वांद्रे येथील गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. मात्र ती निगेटिव्ह आल्याची माहिती देखील मिळत आहे. 
 
दरम्यान सध्या सरोज खान यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आणखी कोणताही त्रास होत नसल्याने एक-दोन दिवसात दवाखान्यातून डिस्चार्जही मिळेल. काळजी करण्याची काहीच कारण नाही, असे देखील सांगण्यात येत आहे.
 

सरोज खान या बॉलिवूडच्या उत्कृष्ट नृत्य प्रशिक्षिका आहेत. हिंदी सिनेमाची अनेक सुपरहिट गाणी कोरिओग्राफ करण्याचे श्रेय सरोज खान यांना जाते.