आकाश ठोसरची सिरीज '१९६२: दि वॉर इन दि हिल्स'साठी निवड: सिरीजमधील भूमिकेला म्हटले 'ड्रीम रोल'
'सैराट' चित्रपटामधून प्रसिद्धी मिळालेला अभिनेता आकाश ठोसर आता या सिरीजमध्येा प्रमुख भूमिकेत दिसणार
मराठी चित्रपट 'सैराट'च्याह यशानंतर भारतभरात त्वरित प्रसिद्धी मिळालेला अभिनेता आकाश ठोसर आता आगामी वॉर-एपिक सिरीज '१९६२: दि वॉर इन दि हिल्स'मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिरीजमध्ये अभय देओल व सुमीत व्यारस यांच्याआसह इतर प्रतिष्ठित कलाकार देखील आहेत. या कलाकारांची नावे लवकरच सांगण्याभत येतील. हॉटस्टार स्पेशल्स सिरीज '१९६२: दि वॉर इन दि हिल्स' वास्तविक घटनांमधून प्रेरित आहे. ही सिरीज शौर्य व पराक्रमाची ऐकण्यात न आलेली कथा सादर करण्यासोबत कशाप्रकारे १२५ भारतीय सैनिक ३००० चीनी सैनिकांविरूद्ध लढले, त्या कथेला देखील दाखवते.
शूरवीरांपैकी एकाच्या भूमिकेत दिसण्याणत येणा-या आकाश ठोसरने नुकतेच सांगितले की, त्याचे लष्कररामध्ये जाण्याचे बालपणापासून स्वनप्नं होते. तो म्हचणाला, ''सिरीज '१९६२: दि वॉर इन दि हिल्स' माझ्यासाठी स्वप्नवत प्रोजेक्ट आहे. बालपणापासून माझे भारतीय सेनेमध्येह जाण्याहचे स्वसप्नम होते आणि मी चित्रपटसृष्टी मध्ये येण्यापूर्वी लष्कीरामध्ये निवड होण्यारसाठी दोनदा परीक्षा देखील दिली होती. फक्त सैन्य अधिकारीच नव्हे तर मी पोलिस सेवेमध्ये देखील दाखल होण्याचा प्रयत्न केला. मी अभिनेता नसतो तर निश्चितच आपल्याप देशाच्या संरक्षणासाठी माझे करिअर सैन्यामध्ये असते.''
तो पुढे म्हीणाला, ''पहिल्यांदाच मला सैनिकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. माझी छाती आनंद व अभिमानाने भरून आली. मला वास्तचविक जीवनात मिळाली नाही तरी रील जीवनामध्ये सैन्याचा पोशाख परिधान करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद झाला. मला अत्यंत खास वाटले. असे वाटले की, मी सैन्यासचाच भाग आहे आणि मी स्वदत:कडे त्याच दृष्टिने पाहिन.''
आकाश ठोसर किशनची भूमिका साकारेल, जो मेजर सुरज सिंग (अभय देओल) नेतृत्वित बटालियनचा भाग आहे. हॉस्टलस्टार स्पेशल्स प्रस्तुत '१९६२: दि वॉर इन दि हिल्स' प्रदर्शित होत आहे २६ फेब्रुवारी २०२१ रोजी फक्ता डिस्ने+ हॉटस्टार व्हीआयपी आणि डिस्ने+ हॉटस्टार प्रिमिअमवर.
पहा '१९६२: दि वॉर इन दि हिल्सज' फक्त डिस्ने+ हॉटस्टार व्हीआयपी आणि डिस्ने+ हॉटस्टार प्रिमिअमवर