सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified बुधवार, 25 जानेवारी 2023 (22:01 IST)

शाहरुख आणि दीपिकाचा ‘पठाण’पहिल्याच दिवशी ५० कोटीहून अधिक कमाई

pathan
‘बेशरम रंग’गाण्यामुळे झालेल्या वादानंतर चित्रपटावर बॉयकॉट ट्रेंडचं सावट होतं. त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल, याबदद्ल उत्सुकता होती. पण, शाहरुखच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मनं जिंकली असून चाहते ‘पठाण’ला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
 
शाहरुख आणि दीपिकाचा ‘पठाण’पहिल्याच दिवशी ५० कोटीहून अधिक कमाई
काही ठिकाणी चित्रपटाचे शो कॅन्सल झाले असले तरी बहुतांश ठिकाणी चित्रपटाचं जबरदस्त ओपनिंग झालं, पहाटे ६ वाजल्यापासून चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली. ‘पठाण’ने अडवांस बुकिंगमध्येच बरेच रेकॉर्ड तोडल्याचं वृत्त समोर आलं होतं, आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर याची पहिल्या दिवसाची कमाई किती असेल याबद्दल चर्चा सुरू आहे.
 
रोहित जयसवाल आणि सुमित कडेल या दोन्ही चित्रपट विश्लेषक आणि तज्ञांनी त्यांच्या ट्वीटमधून ‘पठाण’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा अंदाज बांधला आहे. त्यांच्या माहितीनुसार शाहरुख आणि दीपिकाचा ‘पठाण’ पहिल्याच दिवशी ५० कोटीहून अधिक कमाई करणार आहे. गेल्या वर्षभरात हिंदी चित्रपटांना लागलेलं ग्रहण पाहता यावेळी हिंदी चित्रपट जबरदस्त कमाई करतील हे ‘पठाण’ने सिद्ध केलं आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor