शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (15:26 IST)

गर्लगँगसोबत सुहानाने तिचा बिकिनी अवतार दाखवला! शाहरुख खानची लाडकी स्विमिंग पुलामध्ये हॉट पोज करताना

instagram
शाहरुख खान आणि इंटीरियर डिझायनर गौरी खान यांची मुलगी सुहाना खान यांचा नवीन फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये सुहाना स्विमिंग पूलच्या बाजूला तिच्या गर्लगँगसोबत मस्ती करताना दिसत आहे. 
 
सुहानाची ही छायाचित्रे तिच्या बेस्ट फ़्रेंड्स अलाना मर्केल आणि प्रियांका केडिया यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत. फोटोमध्ये सुहानाची गर्लगाँग बिकिनीमध्ये आणि मोनोकिनी पोझ करताना दिसत आहे. सुहाना तिच्या मैत्रिणीच्या मागे उभी असताना फोटोमध्ये सुहानाचा आऊटफिट काय आहे? ते दिसत नाही. मात्र, सुहानाचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.
 
तिची मैत्रीण अलाना मर्केलने शेअर केलेल्या फोटोवर सुहानाने रेड हॉर्ट इमोजी शेअरवर कॉमेंट केले आहे. तिचा नवीन फोटो पाहून सुहानाचे चाहते खूप खूश आहेत.
 
वाढदिवसाचा फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाला
सांगायचे म्हणजे की सुहाना खानने आपला 21 वा वाढदिवस 22 मे रोजी साजरा केला आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुहाना न्यूयॉर्कमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत मस्त पार्टी करताना दिसत आहे. याशिवाय सुहानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये ती बलूनसह खेळताना दिसत आहे. सुहानाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
 
इंस्टाग्रामवर सुहानाचे 1.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत
सुहाना सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. ती अद्याप बॉलीवूडमध्ये प्रवेश करू शकली नाही, परंतु सोशल मीडियावर तिची जोरदार फॅन फॉलोइंग कायम आहे. इंस्टाग्रामवर सुहानाचे 1.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. हेच कारण आहे की तिचे फोटो किंवा व्हिडिओ येताच सोशल मीडियावर व्हायरल होतात.