बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मे 2024 (08:35 IST)

Shah Rukh Khan Hospitalised शाहरुख खान रुग्णालयात दाखल, तब्येत बिघडली

Shah Rukh Khan hospitalised बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची प्रकृती खालावली आहे. त्यांना तातडीने अहमदाबादच्या 'केडी' रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, अतिउष्णतेमुळे अभिनेता डिहायड्रेशनचा बळी ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये तापमान 40अंशांच्या पुढे होते.
 
शाहरुख खान अहमदाबादमध्ये होता
KKR चा मालक शाहरुख खान काल रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहोचला. यावेळी तो मैदानावर चाहत्यांना टाळ्या वाजवताना आणि जल्लोष करताना दिसला. त्यांचा संघ सनरायझर्स हैदराबादला हरवून आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.