रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 एप्रिल 2024 (21:21 IST)

शाहरुखने जिंकली चाहत्यांची मनं,व्हिडिओ व्हायरल!

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान त्याच्या औदार्यासाठी ओळखला जातो. त्याचा उत्कृष्ट अभिनय आणि त्याचा स्वभाव त्याला इतर कलाकारांपेक्षा पूर्णपणे वेगळा बनवतो. त्यामुळे त्याला बॉलिवूडचा बादशाह म्हटले जाते. तो आपले मोठेपण वारंवार सिद्ध करत असतो. आयपीएल मॅचदरम्यानही असे काही घडले, जे पाहिल्यानंतर कोणीही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
 
'केकेआर'चा सामना संपल्यानंतर शाहरुख खानच्या एका चाहत्याने त्याचा व्हिडिओ बनवला होता. जे या जबरा फॅनने नंतर त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, बॉलिवूडचा एवढा मोठा सुपरस्टार असूनही शाहरुख खानने असे कृत्य केले, ज्यामुळे तो डाउन टू अर्थ व्यक्ती असल्याचे सिद्ध होते. वास्तविक काल कोलकाता येथील ईडन गॉर्डन येथे 'केकेआर'चा सामना झाला. यावेळी शाहरुख खानही त्याच्या टीमला चिअर अप करण्यासाठी तिथे उपस्थित होता. सामना संपल्यानंतर सगळे तिथून निघून गेले. मात्र शाहरुख खानने 'कोलकाता नाईट रायडर्स'चे झेंडे बसण्याच्या जागेवर पडलेले पाहिल्यानंतर किंग खानने स्वत: ते गोळा करण्यास सुरुवात केली.
 
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, शाहरुख व्हीआयपी सेक्शनच्या सीटवर पडलेले केकेआरचे झेंडे उचलून जमिनीवर फेकत आहे. शाहरुखला असे कृत्य करताना पाहून त्याचे चाहते त्याच्या नावाचा जयघोष करतात. काही चाहते शाहरुखला हस्तांदोलन करण्यास सांगतात. जागा साफ केल्यानंतर, शाहरुख वळतो आणि त्याच्या चाहत्यांना फ्लाइंग किस देतो. आयपीएल संपल्यानंतर शाहरुख खानने क्रिकेटच्या खेळपट्टीवर काही खेळाडूंची भेट घेतली आणि काही चाहत्यांचीही भेट घेतली.
Edited By- Priya Dixit