सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (11:51 IST)

माझ्या फोन नंबर सोबत आधार कार्ड क्रमांकही देऊ का - शाहरुख खान

सेलिब्रिटींना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे चाहते कधी काय प्रश्न विचारतील याचा काहीच नेम नसतो. असाच काहीसा प्रश्न किंग खान शाहरुखच्या चाहत्याने त्याला विचारला. तुम्ही मला तुमचा फोन नंबर द्याल का असा प्रश्न त्या चाहत्याने शाहरुखला ट्विटरवरून विचारला.
 
किंग खानने अगदी न चिडता त्या चाहत्याला गमतीशीर उत्तर दिलं. मी माझा फोन नंबर देतो पण त्यासोबत आधार कार्ड क्रमांकही देऊ का असा उलट प्रश्न किंग खानने त्या चाहत्याला केला. किंग खानचं ट्विट पाहून त्या चाहत्याने शाहरुखला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि शाहरुखनेही त्याला चक्क हो म्हटलंय. शाहरूख नेहमीच ट्विटरवर अॅक्टिव असतो. अनेकदा तो आपल्या फॅन्सना उत्तरंही देत असतो.