शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जून 2017 (15:51 IST)

डैडी शाहरुख समेत सर्वांनावर भारी पडला सुहानाचा स्टारडम

शाहरुख खान आणि गौरी खानने नुकतेच एक हॉटेल सुरु केले. त्या उद्‌घाटनाच्या सोहळ्यामध्ये शाहरुख आणि गौरीपेक्षाही त्यांनी कन्या सुहानानेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याला कारणही तसेच आहे. एकतर सुहाना आता मुलगी राहिली नसून एक देखणी युवती झाली आहे. तिच्या भोवतीचे ग्लॅमरस वलय वाढायला लागले आहे. हॉटेलच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या फराह खान आणि अनिल कपूरनेही सुहानाचे विशेष कौतुक केले. तिने पित्याच्या पावलावर पाऊल टाकून अभिनयाच्या क्षेत्रात उतरण्याची तयारी केली आहे. यापूर्वीच सुहानाने स्टेज परफॉर्मन्स करण्याचा अनुभवही गाठिला जमवला आहे. आता तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे केंव्हाही खुले होऊ शकतात. तिच्या ईच्छेनुसारच बॉलिवूडमधील पदार्पणाचा मुहुर्त निश्‍चित करण्याचे शाहरुख आणि गौरीने ठरवले आहे. आता तरी सुहानासाठी कोणत्याही निर्मात्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र शाहरुख कन्येला त्यासाठी वाट बघावी लागणार नाही. स्वतः शाहरुखही त्यासाठी निश्‍चितच उत्सुक असेल, मात्र याबाबत त्याने कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. आता अधिकृत घोषणेपूर्वीच सुहानासाठी काही चांगला पर्याय मिळतो आहे का, हे बघायला हवे.