मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (22:16 IST)

थेंबे थेंबे तळे साचे...शाहरुखचं मराठीत ट्विट

करोनाच्या लढाईत आपण एकत्र आहोत, अशी धीर देणारं‍ ट्विट बॉलीवूड बादशाह शाहरुख खानंने केलं आहे. शाहरुख खाननं करोनाग्रस्तांसाठी मदत जाहीर केली असून त्यानं एक ट्विट केल्यानंतर तो चर्चेत आहे कारण हे ट्विट त्याने मराठी भाषेत केलं आहे. 
 
ह्या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत कारण थेंबे थेंबे तळे साचे. सर्वांनी थोडे थोडे प्रयत्न केले तर एक मदतीचा महासागर तयार होईल.. आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद! असं शाहरुखनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
 
शाहरुख खानची आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्स पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करणार. तसंच रेड चिलीज एण्टरटेनमेन्ट महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करणार. 
 
तसेच कोलकाता नाइट रायडर्स आणि मीर फाउण्डेशन मिळून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 हजार पीपीई किट उपलब्ध करून देणार आहे.