मंगळवार, 10 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 (12:20 IST)

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

Shaktiman : भारतातील पहिला सुपरहिरो शो 'शक्तिमान' पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा शो 90 च्या दशकात मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता आणि भारतीय टीव्हीचा एक आयकॉनिक शो बनला होता.
 
तसेच या शोमध्ये मुकेश खन्ना मुख्य भूमिकेत होते. ज्यांनी शक्तीमानची भूमिका साकारली होती आणि याद्वारे त्यांनी लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शक्तीमान हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार असल्याची घोषणा मुकेश खन्ना यांनी केली आहे. नुकताच त्याचा नवीन टीझर भीष्म इंटरनॅशनलच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
 
पण, शक्तीमान चित्रपट वेब सीरिज किंवा सीरिअल म्हणून परतणार की नाही हे मुकेश खन्ना यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. पण तो चित्रपटाच्या रूपात येईल अशी अपेक्षा आहे, कारण याआधीही शक्तीमान चित्रपटाबाबत चर्चा झाल्या आहे.