गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शिल्पा शेट्टी नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणार

शिल्पा शेट्टीची स्वच्छ भारत अभियानाची ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे ती आता माध्यमांतून नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणार आहे. चित्रपट जगतात आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत राहणारी शिल्पाची तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळते.

शिल्पाला स्वच्छ भारत अभियानाचे ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त केल्याने तरुणांना स्वच्छतेबाबत प्रेरणा मिळेल, अशी माहिती अभियानाचे शहरी विकास मंत्रालयातील संयुक्त सचिव तथा स्वच्छ भारत अभियानाचे संचालक प्रविण प्रकाश यांनी सांगितले.