शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

थेट लंडनमध्ये कुटुंबासह साजरा केला शिल्पाने तिचा खास दिवस !

एक अभिनेत्री, मॉम-प्रेन्युअर आणि फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टी ! शिल्पा सध्या अनेक जबाबदाऱ्या सहज रित्या पार पाडते आहे. तिच्या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्वाच नेहमीच कौतुक केलं जातं. ती दोन दशकांहून अधिक काळ भारतातील आणि जगभरातील लाखो लोकांसाठी ती एक प्रेरणा आणि स्टाईल आयकॉन बनली आहे. 
 
शिल्पा यंदाचा तिचा वाढदिवस घरापासून लांब लंडनमध्ये कुटुंबासोबत साजरा करत आहे. 
 
शिल्पा नेहमीच फिटनेस फ्रिक राहिली आहे. ती योगा, कार्डिओ, पिलाटेस आणि अश्या अनेक गोष्टी करते. फिट राहण्याचा सोबतीने निरोगी खाण्याच्या सवयी, मानसिक निरोगीपणा आणि सकारात्मक विचारांना देखील प्रोत्साहन देताना दिसते. तिचे इंस्टाग्राम आणि YouTube लोकांना निरोगी जीवनशैली जगण्यासाठी नेहमीच प्रेरित करत. आरोग्य आणि निरोगीपणा आणि निरोगी अन्न पाककृती यावर एक पुस्तक देखील प्रकाशित केले आहे.
 
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने हे सिद्ध केले आहे फिट राहणं हे सगळ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. लवकरच शिल्पा ला सुखी, भारतीय पोलीस दल आणि केडीमध्ये पाहणार तिचे चाहते पाहणार आहे. शिल्पा ला पुन्हा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.