1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 18 एप्रिल 2024 (14:21 IST)

शिल्पा शेट्टीची कोट्यवधी संपत्ती ईडीकडून जप्त

ईडीने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि तिचे पती राज कुंद्रा यांची 97 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच ईक्विटी शेअर, बांगला हा देखील जप्त करण्यात आला आहे. ही मोठी कारवाई ईडीने आज सकाळी केली. एकूण 97 कोटीची मालमत्ता जप्त झाल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे. ईडीने ही मोठी कारवाई केली असून शिल्पा शेट्टी यांचा बांगला देखील जप्त केला गेला आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात राज कुंद्रा याच्यावर कारवाई केले असून, पुण्यातील बांगला, जुहूमधील बांगला, फ्लॅट आणि इक्विटी शेअर्स हे जप्त झालेले आहे. राज कुंद्रावर बिटकॉइन घोटाळा केल्याचा आरोप असून लोकांना गुंतवणुकीच्या बदल्यात 10 टक्के परतावा दर महिन्याला देण्याचे अमिष त्याने दाखवले होते.  तसेच राज कुंद्रा हे बिटकॉइन प्रकरणात फायदा करवून घेऊन 150 कोटींच्या फायद्यात असल्याचेही ईडी सांगत आहे. 
 
बिटकॉईन घोटाळ्यात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचे नाव आले होते. असे सांगितले जात आहे की, त्यांनी दोन हजार कोटींचा घोटाळा केला आहे. म्हणून या प्रकरणात पाहिजे देखील ईडीने दोघांना 2018 मध्ये समज दिली होती. तसेच त्यांची चौकशी होऊन या प्रकरणातील मुख्य आरोपीला देखील अटक करण्यात आली होती. तसेच यापूर्वी ही आयपीएलच्या सट्टेबाजीतही राज कुंद्राचे नाव आले होते. आयपीएलची टीम राजस्थान रॉयल्सचे ते मालक होते. तसेच 2021 साली राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ बनवल्याचा प्रकरणामुळे अटक केली गेली होती. आता बिटकॉईनच्या प्रकरणात नाव आल्याने सर्व मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. बिटकॉईन म्हणजे कोणीही कुठूनही कधीही पैशाचा व्यवहार करू शकतं. एक प्रकारची ही व्हर्च्युअल करन्सी असते. तसेच बँकांचा यात काही संबंध नसतो. झालेल्या या प्रकरणामुळे बॉलीवूडला धक्का बसला आहे. 

Edited By- Dhanashri Naik