शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 मार्च 2024 (13:17 IST)

या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा,लहानपणी झालं लैंगिक शोषण

somy ali
आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्या त्रासदायक आणि ना विसरणाऱ्या असतात. मुंबई सारख्या महानगरात लोक आपली स्वप्न पूर्ण करायला येतात. काहींचे स्वप्न पूर्ण होतात तर काहीसोबत काही विचित्र घडते.जे नेहमीसाठी लक्षात राहते. अशाच एका बालपणीच्या घटनाचा खुलासा एका अभिनेत्रीने केला आहे. ही अभिनेत्री 90 च्या दशकाची असून तिचे नाव सलमान खान सोबत जोडले गेले होते. या अभिनेत्रीने तिच्या बालपणीच्या एका खळबळजनक घटनेचा खुलासा केला आहे. तिने तिच्यावर झालेल्या शारीरिक अत्याचाराबाबत सांगितले आहे. 

या अभिनेत्रीचं नाव आहे सोमी अली. नुकतीच तिने तिच्या बालपणी लैंगिकछळ झाल्याचा उल्लेख केला आहे. एका मुलाखतीत सोमी अलीने काही धक्कादायक खुलासे केले असून लहानपणी तिचे लैंगिक शोषण झाल्याचे सांगितले. सोमीने सांगितले की, तिचे वडील चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता होते, त्यामुळे त्यांचे अभिनेत्रींशी संबंध होते. सोमी अलीच्या म्हणण्यानुसार, तिचे आई-वडील सतत एकमेकांशी भांडायचे.  
मी पाच वर्षांची होते, जेव्हा माझ्या घरातील स्वयंपाकीकडून माझे लैंगिक शोषण झाले आणि नंतर वयाच्या नऊव्या वर्षी द्वारपालाने माझे लैंगिक शोषण केले.शाळेत लक्ष केंद्रित करू शकत नव्हते. मी त्यावेळी पीटीएसडी आणि ट्रॉमा आजाराने ग्रासलेले होते. याची मला काहीच कल्पना नव्हती. 

भारतात असताना मी अनेक गोष्टी अनुभवल्या, मग ते घनिष्ठ नातेसंबंध असोत, व्यावसायिक असोत आणि माझ्या मैत्रीतही असोत. पण माझे सर्वात वाईट स्वप्न माझे नाते होते, ज्याचा त्रास मी अजूनही भोगत आहे कारण 22 वर्षांपूर्वी संबंध तोडूनही मला अजूनही त्रास दिला जात आहे. सोमीला अनेकदा सलमानचा राग येतो आणि अलीकडेच तिने अभिनेत्याला वुमन बीटरही म्हटले होते. इतकेच नाही तर सलमान खानसोबतच्या तिच्या नात्याच्या आठवणी आजही तिला सतावत असल्याचे सोमीने म्हटले आहे.  
 
Edited by - Priya Dixit