मंगळवार, 27 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (17:16 IST)

‘शुभ मंगल सावधान’ चा ट्रेलर रिलीज

shubh-mangal-saavdhan-official-trailer-released

आयुष्मान  खुराना  आणि भूमी पेडणेकर  यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी शुभ मंगल सावधान सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. नॉन कूल मुदित शर्मा आणि नॉन हॉट सुगंधा जोशी यांची विनोदी कहाणी यात पाहायला मिळणार असून, आनंद एल राय यांच्या कलर येलो प्रॉडक्शनखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. शुभ मंगल सावधान हा सिनेमा कल्याण समयाल साधम या सुपरहिट तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. आर. एस. प्रसन्ना यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले असून, 1 सप्टेंबर 2017 रोजी रिलीज होणार आहे. डबल मिनिंग जोक्स या सिनेमात असून, अडीच मिनिटांच्या या ट्रेलरवरुन लक्षात येतं की, सिनेमात कॉमिक लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे.