1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (16:54 IST)

शहनाज गिलच्या हातात सिद्धार्थ शुक्लाचा टॅटू

Instagram
अभिनेत्री शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला मध्ये चांगली मैत्री होती. ते लग्न देखील करणार असल्याचे निश्चित झाले होते.परंतु सिद्धार्थ वर काळाने झडप घेतली आणि तो कमी वयात जगाचा निरोप घेऊन गेला. सिद्धार्थच्या एकाएकी निघून गेल्यामुळे शहनाज कोलमडून गेली होती. सिद्धार्थ शुक्लाला जगाचा निरोप घेऊन एक वर्ष झाला आहे. अभिनेत्री शहनाज त्याला जिथे जाते सिद्धार्थला सोबत घेऊन जाते. शहनाज लालबागच्या राज्याचे दर्शन करण्यासाठी आलेली असताना तिच्या हातात असलेल्या सिद्धार्थच्या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधले आहे. शहनाज लालबागच्या राजाच्या दर्शनाला आपल्या भावाच्या सोबत आली होती. तिच्या भावाने सिद्धार्थची आठवण म्हणून आपल्या हातावर सिद्धार्थच्या चेहऱ्याचे टॅटू बनवले आहेत. 
तिने आपल्या भावासोबत शाहबाज बदेशा सोबत लालबागला आल्यावर सर्वांचे लक्ष वेधले तिच्या भावाने आपल्या हातावर सिद्धार्थचा टॅटू बनवला आहे. शहनाज आणि तिचा भाऊ शाहबाजचा हातावर सिद्धार्थचा चेहरा असलेला टॅटू सर्वांचे लक्ष वेधत होते . सिद्धार्थ आता भावाच्या शरीराचा एक भाग झाला आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो मध्ये शहनाज आणि शहाबाज दिसत आहे. शहनाज ने पिवळा रंगाचा पलाझोसूट घेतला असून हातात बांगड्या, कानात मोठे झुमके कपाळावर टिकली लावली आहे. तसेच शाहबाज ने देखील पांढऱ्या टीशर्ट आणि क्रीम कलरची पॅन्ट घातली होती. 
शहनाज आता बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार असून 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे.