गुरूवार, 29 फेब्रुवारी 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (12:21 IST)

फिटनेसबाबत खूप जागरूक होता सिद्धार्थ शुक्ला, अचानक मृत्यूमुळे सर्व हैराण

बिग बॉस 13 विनर आणि एक्टर सिद्धार्थ शुक्लाचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाल्याने सर्व हैराण आहे कारण तो अत्यंत फिट होता आणि आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेत होता.
 
सिद्धार्थ शुक्लाने एक्टिंग करियरची सुरुवात 2008 मध्ये टीव्ही शो 'बाबुल का आंगन छूटे ना' याहून केली होती. सिद्धार्थ शुक्लाला टीव्ही मालिका 'बालिका वधु' याने खूप प्रसिद्धी मिळाली होती. सिद्धार्थ अनेक रिएलिटी शो करुन चुकले होते.
 
सिद्धार्थ शुक्ला आपली बॉडी फिट ठेवण्यासाठी दररोज जिम कराचये. त्याने अनेक इंटरव्यू दरम्यान सांगितले होते की जिमसोबत तो आपल्या डायटकडे पूर्णपर्ण लक्ष ठेवत होता. दररोज सकाळी ब्रेकफास्टमध्ये अंडी खात होता. जिममध्ये एक्सरसाइज करताना सिद्धार्थ दररोज कार्डियो देखील करत होता.
 
सिद्धार्थ आपल्या आईची खूप लाडका होता. त्याला आईच्या हाताने तयार जेवण खूप आवडायचं. सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीमुळे मनोरंजन जगात शोक पसरला आहे. कोणालाही विश्वासच बसत नाहीये की सिद्धार्थने अचानक या जगाचा निरोप घेतला.