1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (16:22 IST)

'चीकू की मम्मी दूर की' मधील मिथुन चक्रवर्तींशी संबंधित ही बातमी तुम्हाला नक्कीच देईल आश्चर्याचा धक्का!

'चीकू की मम्मी दूर की' या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून, चाहते स्टार प्लसच्या या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या या मालिकेच्या प्रोमोने मालिकेबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
 
आपण सगळेच या गोष्टीशी सहमत होवू की, मोठे मोठे अभिनेते सहसा चित्रपट किंवा इतर प्रकल्पांमध्ये अतिशय व्यस्त असतात आणि ते त्याच्यासाठी मानधन म्हणून भली मोठी रक्कम आकारत असतात. मात्र, कधीकधी ते त्यांच्या मानधनात मोठ्या प्रमाणात कपात देखील करतात, विशेषत: एखादा प्रकल्प जेव्हा त्यांच्या हृदयाच्या जवळ असेल किंवा ते त्याच्याशी भावनिकरित्या जोडले गेलेले असतील. आणि याचे ताजे उदाहरण म्हणजे प्रसिद्ध डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती.
 
मिथुन चक्रवर्ती, जे नुकतेच 'चीकू की मम्मी दूर की' च्या नव्या प्रोमोमध्ये दिसले आणि त्यांच्या सहभागाने त्यांनी आपल्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केले होते. मालिकेच्या नजीकच्या सूत्राच्या म्हणण्यानुसार, “प्रोमोची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या रोलर-कोस्टर प्रवासाच्या फ्लॅशबॅकची आठवण झाली. ते चीकूशी खूप भावनिकपणे जोडले गेले असल्याचे त्यांना जाणवले आणि याच वैयक्तिक कारणास्तव त्यांनी या प्रोमोसाठी आपल्या मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतला. मिथुन सर हे असेच प्रकल्प करण्यासाठी ओळखले जातात ज्यांच्याशी ते भावनिकरीत्या खरोखर जोडलेले असतात आणि या प्रोमोसाठी त्यांनी घेतलेला निर्णय हा खरोखर उदार भाव आहे.”
 
या दिग्गज अभिनेत्याने या मालिकेच्या प्रोमोचा भाग होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचे वैयक्तिक स्वरूप. मिथुन दांच्या स्ट्रगलप्रमाणेच मेहनत आणि यश मिळवण्याची इच्छा असलेल्या चीकूच्या संघर्षमय प्रवासाचे वर्णन या मालिकेत आहे.
 
तेव्हा, पहायला विसरू नका 'चीकू की मम्मी दूर की' 6 सप्टेंबर 2021 पासून, संध्याकाळी 6 वाजता, फक्त स्टार प्लस वर!