रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अभिजितची पुन्हा टीव टीव केली बंद

वादात अडकलेला आणि वादग्रस्त विधाने करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असलेल्या अभिजित गायकाला पुन्हा धक्का लागला आहे. यामध्ये गायक अभिजीत भट्टाचार्य यांच नवीन अकाऊंट ट्विटरने परत एकदा सस्पेंड केले आहे. या गायकाने सोशल साईटवर नवीन असे @singerabhijeet हे नवीन टि्वटर अकाऊंट सुरु केले होते.  मात्र ही बाब लक्षात येताच टि्वटरने पुन्हा त्यांच अकाऊंट सस्पेंड केले. तर आता अधिक बंधने घालत अकाऊंटवर अभिजीत स्वत: टि्वट करु शकत नाहीत तसेच ते अकाऊंटही कोणाला पाहता येणार नाही. 
 
अभिजीत टि्वटरचा गैरवापर करत असून महिलांबद्दल अपमानास्पद भाषा वापरत असल्याची तक्रार अनेक टि्वटर युझर्सनी केल्यानंतर मागच्या मंगळवारी टि्वटरने त्यांच अकाऊंट सस्पेंड केले होते.त्यामुळे आता अभिजित ने वाद वाढवण्या पेक्षा महिलांना सन्मान देणे गरजेचे असून आपली भूमिका योग्य करत सर्वांची माफी मागणे गरजेचे आहे. कारण ज्या चाह्त्यानी त्याला डोक्यावर घेतले त्याला पुन्हा ते जमीनही दाखवत आहेत.