मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 मे 2021 (14:03 IST)

गायक अमित कुमारने त्याच्या वडिलांनी त्याला दिलेले घड्याळ पवनदीपला भेट म्हणून दिल्याने पवनदीप भारावून गेला

Singer Amit Kumar was overwhelmed when his father gave him a watch as a gift.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो इंडियन आयडॉल 12 यावेळेस प्रेक्षकांना संगीताच्या सुवर्ण काळात घेऊन जाणार आहे. गायनावर आधारित या रियालिटी शो ने आजवर कधीच प्रेक्षकांची निराशा केलेली नाही आणि आगामी वीकएंडला या कार्यक्रमात किशोर कुमार 100 सॉन्ग्स विशेष भाग असणार आहे. प्रेक्षकांना सुरांनी मंत्रमुग्ध करण्याची आपली परंपरा चालू ठेवत या शो ने आगामी वीकएंडच्या भागात महान गायक किशोर कुमारचा मुलगा अमित कुमार यास आमंत्रित केले आहे. आपला मजेदार होस्ट आदित्य नारायण गप्पांच्या ओघात अमित कुमारकडून काही अज्ञात किस्से काढून घेण्याचा प्रयत्न करेल, जे ऐकून सर्वांचे नक्कीच मनोरंजन होईल. या भागात परीक्षणाचे काम करणार आहेत हिमेश रेशमिया, नेहा कक्कड आणि अन्नू मलिक. आगामी वीकएंडच्या या धम्माल भागात अनेक सर्प्राइझेस असणार आहेत.
 
पवनदीपने ‘दिलबर मेरे’, ‘मेरे दिल में आज क्या है’ आणि ‘कोरा कागज था ये मन मेरा’ ही गाणी इतकी अप्रतिम म्हटली की ती ऐकून सर्व उपस्थित मंत्रमुग्ध होऊन गेले. सर्व परीक्षक आणि अमित कुमारने त्याला उभे राहून टाळ्या वाजवून दाद दिली आणि त्याच्या गाण्याचे खूप कौतुक केले. अमित कुमारने तर त्याला गाणी स्वरबद्ध करण्यास सुरुवात करण्याचा सल्ला दिला. पवनदीपच्या आवाजाने सर्व जण खूपच प्रभावित झाले होते. अन्नू मलिकने एक मजेदार किस्सा सांगितला. तो म्हणाला, “मी आणि किशोरदा एक गाणे एकत्र रेकॉर्ड करणार होतो. त्या काळात एवढ्या मोठ्या कलाकाराकडून वेळ मिळवणे हे फार जिकिरीचे असे आणि मला किशोरदांनी वेळ दिला होता. रेकॉर्डिंगच्या दिवशी त्यांना आठवण करून देण्यासाठी मी किशोरदांना फोन केला. मागाहून, मी जेव्हा जुहू येथील त्यांच्या घरावरून जात होतो, तेव्हा त्यांच्या घरापाशी मी खूप गर्दी झालेली पाहिली, ते पाहून मला खूप धक्का बसला आणि मी घरी परतलो. मी माझ्या पत्नीला सांगितले की, मला अशी भीती वाटते आहे की, काळाने किशोरदांना आपल्याकडून हिरावून घेतले असावे.”
 
पुढे पवनदीपच्या परफॉर्मन्सवर टिप्पण करत अमित कुमार म्हणाला, “तुझा आत्ताचा परफॉर्मन्स हा ‘महान गायक’ आणि ‘उल्लेखनीय गायक’ यांच्यातला भेद स्पष्ट करणारा होता. तू ‘कोरा कागज’ गाणे म्हटलेस, ते माझ्या मनाला भिडले. तुझ्या आवाजात मला पहाडांचा ध्वनी जाणवला. मी इतका प्रभावित झालो आहे की, आज मी तुला हे घड्याळ भेट म्हणून देत आहे, जे मला माझी कारकीर्द उत्तम चालू असताना माझे वडील महान किशोर कुमार यांनी दिले होते.”