गायिका सुनिधी चौहानशी परफॉर्मेंस करताना गैरवर्तन, गायिकाने अशी दिली प्रतिक्रिया
गायिका सुनिधी चौहानने नुकतेच डेहरादूनमधील एका कॉन्सर्टमध्ये भाग घेतला. त्यावेळी त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले. त्यांच्यावर कोणतीतरी पाण्याची बाटली फेकली. यावर गायिकेने जे केले त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
गायिका सुनिधी चौहान तिच्या फॅशन सेन्स आणि लाइफस्टाइल मुळे नेहमी चर्चेत असते. तिने बॉलिवूड इंड्रस्टीत दोन दशकांहून अधिक काळ आपल्या आवाजाच्या जादूने चाहत्यांची मने जिंकली आहे. डेहरादूनमध्ये परफॉर्मन्स देताना एका व्यक्तीने तिच्यावर पाण्याची बाटली फेकली. त्या वेळी तिने जे प्रतिक्रिया दिली ते पाहून चाहते तिचे कौतुक करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कार्यक्रम करताना तिच्यावर कोणीतरी पाण्याची बाटली फेकली तरीही गायिकेने आपले गाणे सुरूच ठेवले.नंतर तिने बाटली फेकणाऱ्या व्यक्तीला चोख उत्तर दिले. ती म्हणाली- असं करून काय होणार? शो बंद होणार का? आपल्याला असे हवे आहे का? असं म्हटल्यावर प्रेक्षकांनी जल्लोष करायला सुरु केले. नंतर तिचा कार्यक्रम पुन्हा सुरु झाला.
सुनिधी डेहरादूनच्या एसजीआरआर विद्यापीठात कार्यक्रम देण्यासाठी गेली होती. या दरम्यान हा सर्व प्रकार घडला. यावर तिने आपल्या पद्धतीने हे सर्व हाताळले.
तिने या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले आहे. तिने तू झूठी मैं मक्कार या चित्रपटात गाणं गायलं आहे.
Edited By- Priya Dixit